अवघ्या ९ दिवसांत महाराष्ट्रात ४४ कोटी रुपयांचे मद्य, अमली पदार्थ, पैसा यांचा अवैध साठा जप्त !
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. वरील कारवाई १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. वरील कारवाई १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे.
पालघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ६६ सहस्र ९९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा चालू होऊन ५ महिने होऊनही अद्याप ३२ सहस्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.
नियमबाह्य आणि अनधिकृत पद्धतीने पाणीपुरवठा करणारी नळ जोडणी करणार्या सर्व जणांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बांधकाम प्रकल्पासाठी तकलादू पद्धतीने उभारण्यात आलेली पाण्याची टाकी कामगारांवर कोसळली. यात ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ कामगार घायाळ झाले. टाकीच्या ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
सर्वत्रच्या अवैध बांधकामांवर प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? त्यासाठी मागणी का करावी लागते ?
शहरातील रस्त्यांची दुरवस्था पहाता वेळोवेळी सूचना देऊनही रस्त्यांविषयी कोणताही अहवाल आयुक्त कार्यालयात प्राप्त न झाल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विविध अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान अमली पदार्थांचा व्यापार, चोर्या आणि हिंसाचार यांसारख्या अवैध कारवायांमध्ये गुंतलेले आहेत.
‘पंजाबमधील ज्या अधिकार्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालवा. ‘३ वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
एकीकडे व्यसनमुक्ती मोहीम राबवणे, तर दुसरीकडे महसुलासाठी पानमसाला, मद्य आदींवर बंदी न घालणे, हा सरकारी यंत्रणांचा दुटप्पीपणाच !
या प्रकरणात १ सहस्र १० जणांना अटक करण्यात आली आहे. या काळात अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी ५ सहस्र ९० जणांना अटक करण्यात आली आहे.