मुंबईत ९ महिन्यांत ४८४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई –  जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या काळात, म्हणजे ९ महिन्यांत केलेल्या कारवाईत ४८४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात १ सहस्र १० जणांना अटक करण्यात आली आहे. या काळात अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी ५ सहस्र ९० जणांना अटक करण्यात आली आहे.

वर्ष २०२३ मध्ये १ सहस्र ७१४ जणांना अटक करण्यात आली होती, तर ४१३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गेल्या ९ महिन्यांत गांजा या अमली पदार्थांचे सर्वाधिक ५३८ गुन्हे नोंद आहेत आणि ५६१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्या खालोखाल चरस, हेरॉईन, कोकेन असा क्रम आहे.

संपादकीय भूमिका :

अमली पदार्थांची राजधानी बनलेली मुंबई !