पालघरमधील ३२ सहस्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही !

जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार !

प्रतिकात्मक छायाचित्र

पालघर – येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ६६ सहस्र ९९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा चालू होऊन ५ महिने होऊनही अद्याप ३२ सहस्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत; पण ते तोकडे आहेत. (गणवेशाचा वेळेत पुरवठा न करणार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – संपादक)