धर्मसंसदचे संयोजक नीलकंठ महाराज यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रायपूर – छत्तीसगडमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना हद्दपार करण्याची मागणी धर्मसंसदचे संयोजक नीलकंठ महाराज यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्याकडे केली आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात होणार्या अवैध घुसखोरीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
नीलकंठ महाराज म्हणाले की, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान छत्तीसगडचे वातावरण बिघडवत आहेत. ते रेल्वेमार्गांच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये स्थायिक झाले आहेत. ते अमली पदार्थांचा व्यापार, चोर्या आणि हिंसाचार यांसारख्या अवैध कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांचे अन्वेषण करून त्यांना लवकरात लवकर बाहेर पाठवण्यात यावे.
संपादकीय भूमिकानीलकंठ महाराज यांना अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वत:हून घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे ! |