शरीयतमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा अधिकार नसतांना मुलीने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशा दिल्या ?

आरिफ महंमद खान हे मुसलमान विचारवंत आणि अभ्यासक आहेत. त्यांचे विचार भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना पचनी पडणे अशक्य आहे, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल  हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

बुरखा घातला नाही, तर एम्.आय.एम्.वाले मुस्कान खान हिच्यावर आक्रमण करतील, तेव्हा आता पाठिंबा देणारे तिला साथ देतील का ? – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

मुस्कान खान हिने बुरखा घातला नाही आणि एम्.आय.एम्.च्या गुंडांनी तिच्यावर आक्रमण केले तर ? आता तिला पाठिंबा देणारे लोक तिला त्या वेळी पाठिंबा देतील का ?, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे.

सोलापुरात पोलिसांची अनुमती नसतांनाही एम्.आय.एम्. पक्षाच्या महिलांचे आंदोलन

कर्नाटक येथे महाविद्यालयांत हिजाब घालून प्रवेश करण्याविषयी मुसलमान विद्यार्थीनींनी मागणी केल्यानंतर उफाळलेल्या वादाचे पडसाद सोलापुरातही उमटले.

पहिले हिजाब, फिर किताब ! – एम्.आय.एम्. विद्यार्थी संघटनेकडून बीडमध्ये फलकबाजी

यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

याविषयी आता प्राणीमित्र संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ? एरव्ही हिंदूंना असहिष्णु म्हणणारे पुरो(अधो)गामी याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

मृत्यूनंतर माझा दफनविधी औरंगाबाद येथे करा ! – असदुद्दीन ओवैसी, खासदार, एम्.आय.एम्.

‘मृत्यूनंतर माझा दफनविधी संभाजीनगर येथे करा,’ असा पुनरुच्चार एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नुकताच येथे केला आहे. मुसलमान पंथात जिल्ह्यातील खुलताबाद हे शहर पवित्र मानले जाते.

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य करणार ! – हिंदु सेनेची घोषणा

‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

टिपू सुलतानच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा नोंद करा !

अत्याचारी टिपूची वस्तूस्थिती मांडणे हे चूक ते काय ? त्यामुळे इथे ‘चोर तो चोर आणि वर शिरजोर’ अशी भूमिका घेणार्‍या ‘एम्.आय.एम्.’ पक्षावरच शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला ! – असदुद्दीन ओवैसी

मेरठमधील प्रचारानंतर देहली येथे जात असतांना एका टोल नाक्यावर २ जणांनी माझ्या गाडीवर ३-४ गोळ्या झाडल्या. त्यामुळे दुसर्‍या गाडीने पुढचा प्रवास करावा लागला.