मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एम्.आय.एम्.कडून महाविकास आघाडीकडे सहकार्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने कुणीही माझ्यासमवेत किंवा आमच्या आमदारांसमवेत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. महाविकास आघाडीला आमची आवश्यकता असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल, तर आम्ही निर्णय घेऊ. १-२ दिवसांत याविषयी निर्णय घेऊ, असे म्हटले आहे.
राज्यसभेबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू अशी माहिती ओवेसी यांनी दिली.https://t.co/hDYy5uJ0C1
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) June 7, 2022
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांनी त्यांचा स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे; मात्र दोघांकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.