धर्मनिरपेक्षतेला झटका !

क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीपुढे ‘एम्.आय्.एम्.’चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वाहिली पुष्पे !

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी ज्याने तलवार उचलली, त्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीपुढे ‘एम्.आय्.एम्.’चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुष्पे वाहिली आणि या धर्मनिरपेक्ष देशात या अपकृत्यावर टीका करण्याएवढीच वाफ दवडण्याविना कुणी काहीच करू शकले नाही. ‘ज्या धर्मनिरपेक्षतेचे दाखले आपण देत आहोत, त्या धर्मनिरपेक्षतेचा ‘ध’ तरी औरंगजेबाने आज शेष ठेवला असता का ? याचा विचार करा आणि मग खुशाल धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गा’, असे म्हणावे लागेल. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जर राष्ट्रद्रोहाचे उदात्तीकरण खपवून घेतले जात असेल, तर अशी धर्मनिरपेक्षता फेकून द्या. आम्हाला छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्यच प्रिय आहे, त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय होता. मुसलमान असला, तरी त्याची निष्ठा हिंदवी स्वराज्याऐवजी औरंगजेबाच्या पायी असेल, तर त्याला शिवरायांनी काय शिक्षा दिली असती ? याचा विचार करा. अशी औरंगजेबाची पिलावळ देशात राहिल्यास राज्यघटना तरी सुरक्षित राहील का ? याचा भारतातील प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने विचार करायला हवा. राष्ट्रप्रेमाच्या आड येणार नाही, अशी धर्मनिरपेक्षता राष्ट्रासाठी आवश्यक आहे. तिच्या आडून राष्ट्रद्रोह पोसला जात असेल, तर ती फेकून देण्यातच राष्ट्राचे हित आहे.

फाळणीच्या वेळी मुसलमानांसाठी पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र देण्यात आले आहे. धर्माविषयी जर इतकीच खुमखुमी असेल, तर ओवैसींनी पाकिस्तानात जाऊन औरंगजेबाचे थडगे उभारावे आणि त्यापुढे जपमाळ ओढत बसावे. इस्लामी देशांत नाही, इतकी स्वायत्ता आणि लाभ स्वातंत्र्यानंतर भारतातील मुसलमानांना मिळाले आहेत; मात्र याचा अपलाभ घेऊन देशाच्या गद्दारापुढे मान तुकवणार असाल, तर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा राष्ट्रद्रोह सहन करण्यासारखा नाही. मुसलमानांनी औरंगजेबाची कबर मढवावी ? कि देशासाठी योगदान देणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, देशासाठी बलीदान देणारे अशफाक उल्ला खान यांचा आदर्श घ्यावा ? हे ठरवावे. धर्मांध जर औरंगजेबाच्या वाटेवरून चालणार असतील, तर अशा औरंगजेबाच्या चेल्यांचा शिवरायांनी कसा सामना केला होता ! हे हिंदूंनी लक्षात घ्यावे. औरंगजेबासारख्या आक्रमकाला छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवू दिले नाहीत. अशांचे उदात्तीकरण करणारे मुसलमानांपुढे राष्ट्रप्रेमाचा नव्हे, तर राष्ट्रद्रोह आणि धर्मांधता यांचा आदर्श ठेवत आहेत. अशांना शिक्षा करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे कि नाही ? याचा विचार कायदेतज्ञांनी अवश्य करावा; मात्र औरंगजेबासारख्या आक्रमकांच्या चेल्यांना उत्तर कसे द्यावे ? हे राष्ट्रप्रेमींना ठरवावे लागेल.

असा क्रूरकर्मा औरंगजेब !

भारतातील मोगल शासकांपैकी सर्वांत क्रूर शासक म्हणजे औरंगजेब ! ज्याने लाखो हिंदूंचे शिरकाण केले, सहस्रावधी मंदिरांचा विध्वंस केला, ज्याच्याशी संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, त्यासाठी अनेक मावळ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली, ज्याने धर्मवीर संभाजी महाराजांची सैतानालाही लाजवेल, अशा क्रूरतेने हत्या केली, एवढ्यावरच न थांबता मृत्यूनंतरही ज्याने संभाजीराजांच्या देहाची विटंबना केली, तो नीच औरंगजेब ! हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी जिझिया कर लावला. काशी विश्वनाथ, मथुरा, वृंदावन, गोवर्धन आदी हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचा विध्वंस करून त्यांचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. शिखांचे नववे धर्मगुरु तेगबहाद्दूर यांची क्रूर हत्या करणारा, तो औरंगजेब. खरेतर मुसलमानांना भारतामध्ये त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यासाठी कधीही आडकाठी करण्यात आलेली नाही. आज भारतात पारशी, जैन या पंथाचे लोक रहातात; मात्र त्यांनी येथील संस्कृती स्वीकारली; परंतु या संस्कृतीवर घाला घालण्यासाठी आलेल्यांच्या कबरीपुढे जर विखारी मुसलमान नतमस्तक होणार असतील, तर हिंदूंना त्याचे उत्तर द्यावेच लागेल.

राज ठाकरे धर्मांध, मग ओवैसी कोण ?

राज ठाकरे भोंग्यांविषयी बोलल्यावर मुसलमानांपेक्षा काही हिंदूंमधील बाटग्यांनाच मिरच्या झोंबल्या. अनेकांना देशापुढील बेरोजगारी, महागाई आदींची आठवण झाली. राज ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन त्यानुसार कारवाई करण्याचे आवाहन केले होते. ‘सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई झाली नाही, तर मशिदींपुढे भोंगे लावू’, अशी चेतावणी त्यांनी दिली. त्यातील केवळ मशिदीपुढे भोंगे लावण्याचे शब्दच काहींच्या कानात गेले. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाला मात्र त्यांनी सोयीनुसार फाटा दिला. मागील महिनाभर ही मंडळी राज ठाकरे यांना धर्मांध ठरवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ज्याच्या कबरीपुढे ओवैसीने डोके टेकले, तो औरंगजेब जर आता असता, तर कुठे असती धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव ? राज ठाकरे यांना जर तुम्ही धर्मांध ठरवत असाल, तर आक्रमकाच्या कबरीपुढे मस्तक टेकवणाऱ्या त्याच्या पिलावळीला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणणार आहात का ? हिंदूंच्या हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण, अयोध्येतील राममंदिर पाडणाऱ्या बाबरशी निष्ठा आणि आता तर हिंदवी स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबालाही डोक्यावर घेऊन नाचणार असाल, तर या देशात हिंदू-मुसलमान ऐक्य शक्य आहे का ? अशांच्या निष्ठा या देशाशी आहेत कि देशावर आक्रमण करणाऱ्यांशी ? हे स्पष्ट व्हायला हवे. देशावर आक्रमण करणाऱ्यांशी निष्ठा बाळगायच्या असतील, तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे.

मुसलमान जर या देशाशी निष्ठा बाळगत असतील, तर त्यांच्या धर्माला हिंदूंनी कधीही आक्षेप घेतलेला नाही; परंतु जर ते हिंदूंवर आघात करत असतील, तर देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा वारसा महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज अन् देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांच्याकडून हिंदूंना मिळाला आहे, हे लक्षात घ्यावे !

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याऐवजी औरंगजेबापुढे मुसलमान डोके टेकवत असतील, तर हिंदूंनो वेळीच सावध व्हा !