चिनी मांजा आणि दोरा यांवरील बंदीची कडक कार्यवाही करावी !
अलीकडील काही वर्षांत चिनी मांजा आणि चिनी दोरा यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
अलीकडील काही वर्षांत चिनी मांजा आणि चिनी दोरा यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या विविध समस्यांविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था मिरज यांच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मीनी ९ जानेवारी या दिवशी नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. नाट्यगृहात कलाकार, नाट्यकर्मी, प्रेक्षक यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे.
वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
गंगावेस-शिवाजी पूल रस्त्याचे काम हेतूपुरस्सर कासवगतीने करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
वाचनालय लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे बंद असून नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे कार्यालय चालू केले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेथे मटका चालू असतो. तरी तेथील अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी लावण्यात येणार्या फटाक्यांसंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याविषयी हुगळी येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोराचंद मल्लिक यांनी केंद्रीय गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना ई-मेलच्या माध्यमातून निवेदन पाठवले.
प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?
अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.
‘मुस्लिम लीग’ने हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी जशी वेगवेगळी मतदान सूची मागितली होती, तशी ही विचारसरणी आहे. हा धोकादायक विचार असून त्याचा निषेध झाला पाहिजे – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या