धान्य खरेदीसाठी १ लाख बारदाने शासनाने पुरवावीत ! – सतीश सावंत

डावीकडून राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देताना सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत

कणकवली – वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली. जिल्ह्यात शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना चालू आहे. जिल्हाधिकार्‍यांनी त्यासाठी ४९ धान्य खरेदी केंद्रे संमत केली आहेत. त्यांपैकी ३७ केंद्रांवर धान्य खरेदी चालू आहे.