वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या राज्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर लवकरच राजगड तालुका होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळा जवान संघटना आणि तालुक्यातील शिष्टमंडळाला दिली.

सिंधुदुर्ग – तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

असंवेदनशील प्रशासनाला कधी तक्रारीची भाषाच समजत नाही. उपोषण, आंदोलन, रस्ता बंद यांचीच भाषा समजते किंबहुना या भाषेची सवयच झाली आहे. जाधव यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून कारवाई केली, तरच असे अवैध प्रकार थांबतील !

सिंधुदुर्ग : अल्प पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवा !

एकीकडे ‘प्रत्येक मुलाला किमान शिक्षण मिळायलाच हवे’, असे सांगितले जात असतांना पटसंख्या अल्प असल्याने दुर्गम भागातील प्राथमिक शाळा बंद करणे कितपत योग्य ? गरीब आणि आदिवासी भागांतील पालक मुलांना कधी शाळेत पाठवतील का ?

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – चंदगड येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

देशभरात वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था’ तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन मंचर येथेही देण्यात आले.

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून उपवडे येथील धोकादायक शाळेची पहाणी

प्रशासनाला आंदोलनाची आणि बहिष्काराची भाषाच समजते, असे पुन्हा या घटनेतून लक्षात येते ! असे सुस्त प्रशासन काय कामाचे ?

छटपूजा उत्सवात पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी !

उत्तर भारतीय बांधवांकडून शहरातील सर्व घाटांवर छटपूजा उत्सव ३० ऑक्टोबर या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

काही फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे मुद्रित केली जातात. यामुळे असे फटाके फोडल्यावर त्यांचा अवमान होतो. अशा फटाक्यांची विक्री जत येथील बाजारपेठांमध्ये केली जात आहे.

राष्ट्रविरोधी ‘वक्फ कायदा’ त्वरित रहित करा !

वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. हा देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

हिंदूंना हलालविरहित पदार्थ उपलब्ध न केल्यास ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ आणि हल्दीराम यांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालू !

हिंदु समाजासाठी हलाल नसलेले पदार्थ उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा देशभरात ‘मॅकडोनाल्ड’, के.एफ्.सी. आणि हल्दीराम या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी ठाणे येथील ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’च्या वतीने देण्यात आली आहे.