सांगोला येथे तहसीलदारांना निवेदन सादर !
सांगोला (जिल्हा सोलापूर), ८ एप्रिल (वार्ता.) – ३ मार्चपासून ‘झी-5 (ZEE5)’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणार्या क्रूर अकबर आणि त्याच्या परिवाराचे म्हणजे मोगलांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथील तहसीलदार यांना देण्यात आले.
तहसीलदारांच्या वतीने प्रभारी नायब तहसीलदार मिलिंद पेटकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री विकास गावडे, बिरा आगलावे, नरपटराम चौधरी, करताराम चौधरी, जीवाराम पटेल, हरीश कुमार,डॉ. मानस कमलापूरकर, नवनाथ कावळे, भीमराव चौधरी, इदाराम चौधरी, भवरलाल चौधरी, हरीष चौधरी, संतोष पाटणे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.