राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून भाजपकडून बंगालमधील हिंसाचाराचा निषेध !

बंगालमधील निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवून आणला. भाजपच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून हिंसाचाराचा निषेध करण्यात आला.

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

बंगालमध्ये निवडणुकानंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांविषयी कंगना यांनी ‘बंगाल व्हॉयलेन्स’ या हॅशटॅगसह ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे’, असे ट्वीट केले होते. यावरून त्यांचे खाते बंद केल्याचे समजते.

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

बंगाल निवडणुकीचे युद्ध !

आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !

ममता बॅनर्जी यांना २४ घंटे निवडणूक प्रचारबंदी

८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे.

(म्हणे) ‘हिंदु आणि मुसलमान मतांच्या विभाजनाला विरोध करणार !’ – ममता बॅनर्जी यांचे फुकाचे बोल

स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी हिंदू ममता(बानो) यांची कथित धर्मनिरपेक्षता ओळखून आहेत !

मुसलमानांना तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्यावरून ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुसलमानांना संघटित होऊन तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीची थट्टा !

बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.

जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

पंतप्रधान मोदी यांची मुसलमानांकडे मतांचे आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया