पणजी, ७ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गोवा पोलीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ यांच्याकडे ‘इंडियन टायगर्स असोसिएशन’ या संघटनेने तक्रार प्रविष्ट केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ‘प्रिव्हेशन ऑफ इन्सल्टस् टु नॅशनल हॉनर अॅक्ट १९७१’ आणि ‘एम्.एच्.ए. ऑडर २०१५’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदाराने या तक्रारीशी संबंधित एक चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांत प्रसारित केले आहे आणि यामध्ये एका कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रगीत अर्धवटच म्हणत असल्याचे दिसत आहे. तक्रारदाराच्या मते दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमाचे हे चलचित्र आहे.