पिंपरी-चिंचवडमधील मालमत्तांच्या सर्वेक्षणांतील गंभीर चुकांचे लेखा परीक्षण करणार का ?
सहस्रो मिळकतींना चुकीचे क्रमांक देणे, अनधिकृत मालमत्तांची एकत्रित नोंदणी न करता फोड करणे, अधिकची आकारणी, चुकीचे देयके वाटप, असे अनेक गंभीर प्रकार घडले आहेत. या प्रकरणाची त्रयस्थ लेखा निरीक्षकाकडून लेखा परीक्षण करणार का ? अशी लक्षवेधी अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत केली.