विधान परिषद कामकाज
नागपूर – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांवर विरोधी सदस्यांनी प्रविष्ट केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत सत्ताधारी अन् विरोधक यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी या सरकारने गरिबांसाठी काही केले नाही, धर्माच्या नावाखाली युवकांना भडकवले जात आहे, तुमचे सरकार आल्यापासून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा घाट घातला जात आहे, असे आरोप केले. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘फेसबुक लाईव्ह’ करण्याच्या पलीकडे काहीच केले नाही, ‘आरक्षणाची आवश्यकता काय ?’, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते उपस्थित करतात, मराठवाडा-विदर्भाच्या विकासासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले, असे सांगितले.