अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.

‘गूगल पे’द्वारे पैशांचे हस्तांतरण होणार बंद

जानेवारी २०२१ पासून ‘गूगल पे’ या अ‍ॅपवरून ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ (एका खात्यातून दुसर्‍या खात्यात) ही पैसे हस्तांतर करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी गूगलकडून ‘इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम’ आणण्यात येणार असून त्याचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोरोनाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना घोषित

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोरोनाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

अलवर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण

मुलीचे तोंड दाबून दुचाकीवर बलपूर्वक बसवून तिला घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ‘या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली.

म्हैसुरू (कर्नाटक) येथे दलिताचे केस कापणार्‍या केशकर्तनालयाच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि सामाजिक बहिष्कार

हिंदु धर्मात ईश्‍वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्याचे ‘गोंयचो एकवट’ संघटनेच्या बैठकीत आवाहन

कॅप्टन व्हिरियेटा फर्नांडिस यांना गोव्यात राहून फादर स्टेन स्वामी यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता कि नाही, हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेपेक्षा अधिक कळते का ?

वागातोर समुद्रकिनार्‍याचे ‘सनबर्न बीच’ असे नामकरण करण्यास स्थानिकांचा आक्षेप

पोलीस आणि प्रशासन यांत भ्रष्टाचारी असल्यानेच मलिदा खाऊन अनधिकृत बांधकामांना अभय दिले जाते !

पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन

अहमद पटेल ३ वेळा लोकसभेचे, तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते.