काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन

अहमद पटेल

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे २५ नोव्हेंबरला निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या एक मासापासून हरियाणातील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार चालू होते. उपचार चालू असतांनाच त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल ३ वेळा लोकसभेचे, तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते. वर्ष १९७७ मध्ये अवघ्या २६ व्या वर्षी ते गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोचले होते.