केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोरोनाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना घोषित

३१ डिसेंबरपर्यंत नवे नियम लागू

नवी देहली – केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोरोनाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. याआधी अटींसोबत अनुमती देण्यात आलेल्या गोष्टी चालू रहाणार आहेत, असेही सरकारकडून  स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या सूचनांनुसार ‘कंटेनमेंट झोन’मध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठी अनुमती देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन, तसेच पोलीस यांच्यावर नियमांची योग्य कार्यवाही करण्याचे दायित्व असणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांनी संबंधित अधिकार्‍यांचे दायित्व निश्‍चित करावे, अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्याची सक्ती करण्यास सांगण्यात आले आहे.