अलवर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण

काँग्रेसच्या राज्यात असुरक्षित विद्यार्थिनी !

अलवर (राजस्थान) – तिजारा येथे १२ वीमध्ये शिकणार्‍या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर ३ जणांनी सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याची घटना घडली आहे. हे तिघेही तिच्याच गावातील तरुण आहेत. ही मुलगी शिकवणी वर्गाला गेली असतांना आरोपींनी हे दुष्कृत्य केले. पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत.

गावातील नवीन नावाचा तरुण तिच्याकडे आला. ‘वडिलांनी बोलावले आहे’ अशी बतावणी केली. पीडित मुलगी त्याच्यासमवेत गेली. त्यानंतर गावातीलच आणखी २ तरुण त्यांच्याकडे आले. त्यांनी मुलीचे तोंड दाबून दुचाकीवर बलपूर्वक बसवून तिला घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ‘या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली.