लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तरप्रदेश सरकारच्या मंत्रीमंडळाने संमती दिली आहे. यासंबंधी राज्य विधानसभेत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावित संकल्पाच्या आलेखालाही अनुमोदन देण्यात आले.
The state government said that in a meeting led by CM @myogiadityanath, the cabinet approved naming the airport as the Maryada Purshotam Shriram Airport.https://t.co/kmeXmka2af
— Hindustan Times (@htTweets) November 25, 2020
हा प्रस्ताव राज्य विधानसभेने संमत केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून विमानतळासाठी जवळपास ६०० एकर भूमी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला उपलब्ध करून दिली जाईल. विमानतळ तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी ५२५ कोटी रुपयांना संमती देण्यात आली आहे.