समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा हिंदुद्वेष !

हिंदूंनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला विविध सामाजिक माध्यमांद्वारे जाब विचारावा, तसेच सरकारनेही अशांना खडसवावे. असे केले, तरच हिंदु समाजाला किंवा भारताला ‘गृहीत’ धरण्याचा जो प्रकार विदेशी प्रसारमाध्यमांकडून होत आहे, तो थांबला जाईल. असे केल्याने अन्य हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांवर वचक बसेल, हेच खरे !

विधानसभेतील अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ

सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप झाला, तरच हक्कभंग करता येतो. शासनाला हक्कभंगाची व्याप्ती वाढवायची असल्यास वाढवता येईल; मात्र एखाद्या प्रकरणासाठी कायदा अस्तित्वात असतांना त्यासाठी हक्कभंग आणून सभागृहाचा वेळ घालवणे योग्य नाही.

कोरोनामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाकडून केंद्र सरकारकडे प्रोत्साहन पॅकेजची मागणी

८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल ! यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे – इंडियन न्यूजपेपर सोसायटी

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचे स्मारक व्हावे, यासाठी सतत २५ वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यावर्षीचा मानाचा समजला जाणारा ‘रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

पत्रकार समीर देशपांडे यांचा कोरोना काळातील कामगिरीविषयी सन्मान

दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.

रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !

रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये पत्रकार आणि त्याचा मित्र यांची घरात सॅनिटायझरद्वारे जाळून हत्या

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर आहे, हे प्रतिदिन वेगवेगळ्या घटनांमधून उघड होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकारनेही राज्य सरकारला साहाय्य करावे, असेच जनतेला वाटते !

‘इंडियन एक्सप्रेस’ची शोधमालिका : काळ्या पैशासंबंधी होणारे अपहार उघड

यापूर्वी इंडियन एक्सप्रेसने एकामागून एक शोधून काढलेल्या घोटाळ्यांच्या मालिकेतील आर्थिक घोटाळ्यांच्या मालिकेत उघडकीला आल्या आहेत फिनसेन फाइल्स ! त्यासंबंधी जाणून घेऊया . . .