समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – ‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘पालट हा निसर्गनियम आहे; मात्र काळाच्या ओघात आपण वाहून जात नाही ना, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांत जसा भेद आहे, तसाच भेद आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यांत आहे. बातमीदारी आक्रमक असली, तर ती नक्कीच आवडते; मात्र बातमीदारीत आक्रस्ताळेपणा नको. जनतेचे आरोग्य नीट रहावे, यासाठी जसे आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच सामाजिक आरोग्य नीट रहावे, यासाठी वृत्तवाहिन्यांनी प्रयत्न करावेत. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे, ही पत्रकारिता कधीच पटणार नाही.’’