पत्रकार समीर देशपांडे यांचा कोरोना काळातील कामगिरीविषयी सन्मान

आरोग्यमंत्री राजेश टोपे (डावीकडे) यांच्या हस्ते सन्मान स्वीकारतांना समीर देशपांडे (उजवीकडे), तसेच अन्य

कोल्हापूर – कोल्हापूर येथील दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीविषयी ४ डिसेंबर या दिवशी पुणे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.