केरळमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केरळच्या कासारगोड येथून चौकशीसाठी कह्यात घेतलेल्या इस्लामिक स्टेटच्या रियाज अबू बकर या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे.

भारतात मोठे आतंकवादी आक्रमण घडवण्याचे आयएस्आयचे षड्यंत्र

इस्लामिक स्टेट आणि जैश-ए-महंमद यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न : आतंकवाद्यांकडून पुन्हा आक्रमण होण्यापूर्वी त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करणे, हाच बचावाचा योग्य मार्ग आहे; मात्र कणाहीन भारतीय शासनकर्त्यांनी तो कधीही केलेला नाही आणि करूही शकणार नाहीत !

इस्लामिक स्टेटकडून ३३ देशांमध्ये आक्रमणे होण्याचा धोका

जिहादी आतंकवाद्यांच्या या धोक्याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ म्हणणारे काही बोलणार नाहीत; मात्र दुसरीकडे तथाकथित ‘भगवा आतंकवादा’वर तोंड उघडतील !

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील दोघे एन्आयएच्या कह्यात

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) केरळच्या कासारगोडमधून २ तरुणांना कह्यात घेतले आहे. ‘भारतीय तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणार नाहीत’, असे म्हणणार्‍या भाजपच्या गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

भारतातून आतंकवाद्यांच्या सहभागाविषयी चौकशीस आरंभ

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये आतंकवाद्यांना भारतातून साहाय्य मिळाले होते का, याची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआए) करत आहे. या प्रकरणी एन्आयए श्रीलंकेच्या सुरक्षायंत्रणांना सहकार्य करत आहे.

श्रीलंकेमध्ये इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले.

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील भारतीय वंशाच्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांवर भारताचे लक्ष

भारतात घातपात करण्याची शक्यता : आतंकवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात वेळ का वाया घालवायचा ? त्याऐवजी ते असतील, तेथे घुसून त्यांचा निःपात का केला जात नाही ? हिंदूंना आतंकवादी म्हणणारे ‘इस्लामिक स्टेटचे आतंकवादी कोणत्या धर्माचे आहेत’, हे का सांगत नाहीत ?

गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यास आमच्याकडून हलगर्जीपणा ! – श्रीलंकेच्या पंतप्रधानांची स्वीकृती

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असा हलगर्जीपणा केल्यावर काय होते, हे भारतानेही अनुभवले आहे ! भारतीय गुप्तचर यंत्रणा भारतीय शासनकर्त्यांना आणि श्रीलंकेलाही महत्त्वाची गोपनीय माहिती देते; मात्र जसे भारतात त्याचा काहीच परिणाम होत नाही, तसाच श्रीलंकेतही झाला नाही, हेच लक्षात येते !

न्यूझीलंडच्या मशिदींमधील गोळीबाराचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेतील चर्चमध्ये बॉम्बस्फोट

हिंदूंनी त्यांच्यावरील आक्रमणांचा असा सूड घेतला असता, तर देशात एकही धर्मांध शिल्लक राहिला नसता; मात्र हिंदूंनी तसे केेले नाही, हे पुरो(अधो)गामी जाणतील का ? आणि आतातरी ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे सांगतील का ?

हिंदू सहिष्णु असल्यानेच असे करत नाहीत !

न्यूझीलंडमधील २ मशिदींमध्ये एका ख्रिस्त्याने केलेल्या गोळीबाराचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेतील चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले


Multi Language |Offline reading | PDF