पुणे : राजस्थानमधून पसार झाल्यानंतर पुणे शहरात इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेचे जाळे सक्रीय करण्यासाठी काही आतंकवादी काम करत होते. पुणे पोलिसांनी १८ जुलैला २ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर ‘इसिस मॉड्यूल’ची माहिती मिळल्यावर हे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात आले. एन्.आय.ए.ने या प्रकरणात १५ हून अधिक जणांना अटक केली. त्यात ठाणे, मुंबई आणि पुणे शहरांतील आतंकवाद्यांचा समावेश आहे. त्यांंच्या चौकशीतून रेल्वेच्या उत्तर विभागातील एका लिपिकाने रेल्वेचा पैसा आतंकवाद्यांना दिल्याचे समोर आले आहे. आता एन्.आय.ए. त्या रेल्वे लिपिकाचा शोध घेत आहे.
(सौजन्य : India Today)
असे उघड झाले प्रकरण !या लिपिकाने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय देयके सादर केली. त्या माध्यमातून मिळालेला पैसा त्याने आतंकवाद्यांना दिला. या प्रकरणी देहली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. देहली पोलिसांच्या विशेष शाखेने, एन्.आय.ए.ने ५ लाखांचा पुरस्कार घोषित केलेल्या शाहनवाजसह ३ आतंकवाद्यांना देहलीतून अटक केली. या आतंकवाद्यांच्या चौकशीतून अनेक गुपिते बाहेर आली आहेत. त्यात लिपिकाने आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याची माहिती मिळाली. या लिपिकाला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. |