महाराष्ट्र इसिसच्या आतंकवादी ‘मॉड्युल’ प्रकरणातील ६ मुख्य आरोपींविरोधात आरोपपत्र प्रविष्ट !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची कारवाई !

मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने महाराष्ट्र इसिसच्या आतंकवादी ‘मॉड्युल’ प्रकरणातील ६ मुख्य आरोपींविरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणात यंत्रणेने इसिस ‘हँडलर्स’चे (आदेश देणार्‍यांचे) जागतिक संबंध आणि सहभाग असल्याचा कट उघड केला आहे. भारतामध्ये इसिसच्या आतंकवादी आणि हिंसक विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी ही आतंकवादी यंत्रणा कार्यरत आहे.

मुंबईचा ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला लालाभाई, शर्जील शेख आणि बोरीवली-पडघा येथील आकीफ अतीक नाचन, तसेच जुबेर नूर महमंद शेख अबू नुसैबा आणि पुण्ो येथील डॉ. अदनानली सरकार अशी आरोपींची नावे आहेत. ‘या आरोपींनी लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवण्याच्या, तसेच भारताची धर्मनिरपेक्ष आचारसंहिता, लोकशाही, संस्कृती आणि शासनप्रणाली यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने आतंकवादी कारवायांना पुढे नेण्याचा कट रचला होता’, अशी माहिती देण्यात आली आहे.