राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची विशेष न्यायालयात माहिती !
मुंबई – महंमद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये बाँबस्फोट करण्याचा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने नुकतेच याविषयीचे तिसरे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले.
पुणे येथील कोंढवा भागात त्यांनी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. कोल्हापूर आणि सातारा परिसरातील जंगलांत त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँबस्फोट केले होते. शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. हे आतंकवादी महाराष्ट्रात इस्लामिक स्टेटच्या विचारधारेचा प्रसार करून तरुणांना भडकावत होते. ते परदेशातील इस्लामिक स्टेटच्या म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बाँबस्फोट बनवण्याचे साहित्य मिळवले होते, असे एन्.आय.ए.ने आरोपपत्रात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|