सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिरात चोरी

यामध्ये देवीच्या मूर्तीमागील ५ किलो वजनाची चांदीची प्रभावळ आणि दानपेटीतील अनुमाने ५ सहस्र रुपये, अशी एकूण ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली.

जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरातून पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्तींची चोरी !

तीर्थक्षेत्राचा दर्जा असणार्‍या मंदिरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे हा हिंदु धर्मावरील मोठा आघातच होय !

कोल्हापूर येथील लक्ष्मी मंदिरातील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे दागिने चोरीला !

हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.

आंध्रप्रदेश सरकारची सावकारी !

एकूणच आंध्रप्रदेशमधील वाढता हिंदुद्वेष आणि त्याचे वेगाने होणारे ख्रिस्तीकरण, ही हिंदू आणि राष्ट्रप्रेमी यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. याविरुद्ध समस्त हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांनी संघटित झाले पाहिजे अन्यथा पाद्री उपेंद्र राव यांचे देशद्रोही स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही !

सालेम (तमिळनाडू) शहरातील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवा ! – मद्रास उच्च न्यायालय

सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.

गोवा : सर्वण येथील श्री सातेरी मंदिरातून सुवर्णालंकारासह २ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज पळवला

देवीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि नथ, मंदिरातील समया, घंटा आदी वस्तू चोरल्या. चोरांनी दानपेटीला हात लावला नाही. मंदिर समितीने याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. या मूर्ती खरेदी करणारे सैफुद्दीन आणि जकारिया अनवर यांनाही अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीनंतर श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील पाटण गावातील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी करण्यात आल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.