कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीनंतर श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

नवी देहली – देशात नुकताच मोहरम साजरा करण्यात आला. या वेळी मुसलमानांकडून धार्मिक मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीच्या वेळी उत्तरप्रदेश बिहार आणि मध्यप्रदेश येथे काही ठिकाणी त्यांच्याकडून हिंसाचार करण्यात आला.कानपूरमधील यशोदानगर येथे रस्त्याच्या लगत असणार्‍या मंदिरातील श्री हनुमानाची मूर्ती तोडण्यात आली, तसेच अनेक ठिकाणी हिंदूंच्या दुकानांचीही लूटमार करण्यात आली. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने हिंदू एकत्र आले. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !