गोवा : सर्वण येथील श्री सातेरी मंदिरातून सुवर्णालंकारासह २ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज पळवला

हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

(प्रतिकात्मक चित्र)

डिचोली, १३ ऑगस्ट (वार्ता.) – सर्वण, डिचोली येथील श्री सातेरी मंदिर फोडून आतील सुवर्णालंकारासह २ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरांनी पळवला. ११ ऑगस्टची रात्र ते १२ ऑगस्टची पहाट या कालावधीत ही चोरी झाली. हे मंदिर गावापासून काही अंतरावर निर्जन स्थळी आहे. चोरांनी मंदिराच्या गर्भकुडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. देवीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि नथ, मंदिरातील समया, घंटा आदी वस्तू चोरल्या. चोरांनी दानपेटीला हात लावला नाही. मंदिर समितीने याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.