कोल्हापूर येथील लक्ष्मी मंदिरातील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे दागिने चोरीला !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिर

आजारा (जिल्हा कोल्हापूर) – हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली. मंदिराची देखभाल करणारे सुनील पाटील यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती; मात्र चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणाही चोरून नेली. त्यामुळे अन्वेषणात अडथळे निर्माण झाले आहेत.