जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील पाटण गावातील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी करण्यात आल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. चोरी करण्यापूर्वी हा चोर देवीला हात जोडून प्रार्थना करत असल्याचे, तसेच चोरी केल्यानंतर क्षमा मागत असल्याचे दिसत आहे. त्याने मंदिरातून ३ दानपेटींतील पैसे, पूजेची भांडी आणि २ मोठ्या घंटा चोरल्या. त्याने तोंडवला झाकला होता, त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तो मंदिराचे कुलूप तोडून आत घुसला होता. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

सौजन्य डेली वायरल विडीओ