सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिरात चोरी

सावंतवाडी – तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रसिद्ध असलेल्या श्री माऊलीदेवीच्या मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार २१ ऑगस्ट या दिवशी उघड झाला. यामध्ये देवीच्या मूर्तीमागील ५ किलो वजनाची चांदीची प्रभावळ आणि दानपेटीतील अनुमाने ५ सहस्र रुपये, अशी एकूण ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली. या प्रकरणी दिनेश चंद्रकांत सोनुर्लेकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !