कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

कराची (पाकिस्तान) – गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली.

चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. या मूर्ती खरेदी करणारे सैफुद्दीन आणि जकारिया अनवर यांनाही अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.