अक्षरधाम मंदिरावरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला : एकास अटक

भारतीय प्रजासत्ताकदिनी राजधानी देहली, तसेच अक्षरधाम मंदिर येथे आखण्यात आलेला आक्रमणाचा कट पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी देहलीहून भोपाळ शताब्दी एक्सप्रेसमधून एकास मथुरा येथे अटक

तमिळनाडूतील हिंदु मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंकडे सुपूर्द करण्याची शिवसेनेची मागणी

तमिळनाडू सरकारने हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंकडे सुपूर्द करावे, अशी मागणी करत शिवसेनेने येथील चेपॉक बंगल्याजवळ निदर्शने केली.

तिरुपती बालाजी मंदिरात काम करणार्‍या ४२ ख्रिस्ती कर्मचार्‍यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार

हिंदूंच्या जगप्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिरात ४२ ख्रिस्ती कर्मचारी काम करत असून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार केला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्‍न विचारला आहे.

(म्हणे) बंदुकीचा धाक दाखवून मला धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याचे मान्य करायला लावले ! – संशयित परेरा याचा पोलिसांवर पलटवार

धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या १० प्रकरणांमधून पुराव्याअभावी निर्दोष सुटका झालेला संशयित फ्रान्सिस परेरा याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या १० व्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर संशयित परेरा पत्रकारांशी बोलतांना म्हणाला, मला या प्रकरणांमध्ये कसे गुंतवण्यात आले याचा मी खुलासा करणार आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याकडून दर्शनासाठी भाविकांकडून शेकडो रुपयांची आकारणी

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे ३ लक्ष रुपये सदर सदस्याने गोळा केले आहेत.

दिवार येथील मंदिरात चोरीचा प्रयत्न करणार्‍या दोन धर्मांधांना अटक

दिवार येथील एका मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न स्थानिक जागरूक नागरिकांमुळे फसला. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी संशयित इब्राहीम माधीवकुट्टी आणि नूर महंमद यांना अटक केली आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या ६ मंदिरांतील १२ मूर्तींची तोडफोड करून विटंबना !

बांगलादेशच्या नारायणगंज जिल्ह्यात असलेल्या लांगोलबंध भागातील श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची

जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यावर बंदी ! – ओडिशा सरकारचा निर्णय

ओडिशा सरकारने येथील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये अतीविशिष्ट व्यक्तींसह कोणत्याही भाविकाला प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे.

डोंबिवली येथील गावदेवीच्या मुखवट्याची चोरी

डोंबिवली (पूर्व) येथील कचोरेेगाव गावदेवी मंदिराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोराने २० सहस्र रुपये मुल्याचा अंदाजे अर्धा किलोचा पंचधातूचा मुखवटा चोरून नेला.

हिंदूनो, मंदिरे वाचवा ! धर्म वाचवा !!

भ्रष्ट निधर्मी राज्यकर्त्यांनी मंदिरांचे सरकारीकरण करून या मंदिरांची भूमी हडपणे, निधीचा अपहार करणे, स्वतःचा आणि स्वकियांचा स्वार्थ साधणे यांसारख्या कृती केल्या.


Multi Language |Offline reading | PDF