आंध्रप्रदेश सरकार राज्यातील २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेणार !

  • भूमी सुरक्षित रहाण्यासाठी ती कह्यात घेणार असल्याचा सरकारचा दावा !

  • भूमीचे मूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक !

हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित

विजयवाडा (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. या भूमी नियंत्रणात घेण्यावरून बर्‍याच काळापासून वाद चालू आहे.

धर्मादाय खात्याचे मंत्री कोट्टू सत्यनारायण

१. आंध्रप्रदेशचे धर्मादाय खात्याचे मंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी दावा केला आहे की, सरकार मंदिर आणि त्यांची संपत्ती सुरक्षित ठेवू इच्छित आहे. यासाठी सुरक्षेचे योग्य उपाय केले जात आहेत. मंदिरांच्या भूमीची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी एक संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) यापूर्वीच बनवण्यात आली आहे.

२. सध्या मंदिरांच्या ज्या भूमी चिन्हांकित करण्यात आल्या आहेत, त्यांच्या संदर्भातील वाद निकाली काढण्यात येणार आहेत. या संदर्भात विजयवाडा येथील श्री दुर्गा मल्लेश्‍वर स्वामीवर देवस्थानाच्या वादग्रस्त भूमीविषयी चर्चा करण्यात आली. यावर लवकरच उपाय काढण्यात येणार आहे.

३. राज्यातील मंदिरांची भूमी संरक्षित करण्यासाठी सर्व २६ जिल्ह्यांतील धर्मादाय आयुक्तांसमवेत समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मंदिरांच्या भूमीचे रक्षण करण्याचा आदेश देण्यात आला.

(सौजन्य : Rashtriya Hindi News) 

संपादकीय भूमिका

  • देशातील एकाही चर्च किंवा मशीद यांचे सरकारीकरण झालेले नाही किंवा त्यांच्या मालकीच्या भूमीवर सरकार नियंत्रण घेण्याचा विचारही करत नाही; मात्र देशात हिंदूंची लाखो मंदिरे आतापर्यंतच्या सरकारांनी कह्यात घेऊन त्यांच्या संपत्तीचा वाटेल तसा वापर केला आहे. आता भूमीही कह्यात घेऊन त्यांचाही वाटेल तसा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
  • पूर्वीच्या काळी शासनकर्ते मंदिरांना पैसे अर्पण करत होते, तर हल्लीचे शासनकर्ते मंदिरांचे पैसे लुबाडत आहेत आणि हिंदू भाविक त्याकडे निष्क्रीयपणे पहात आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद !