|
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील चंदननगरातील शीतलामाता मंदिरात धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करून तेथील हिंदूंना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
१. या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. येथे २ कामगार काम करत असतांना काही महिला तेथे पूजा करण्यासाठी आल्या. त्या वेळी राशिद, इम्रान आणि फिरोज तेथे आले. त्यांनी कामगारांना काम करण्यापासून रोखले आणि मारहाण केली. तसेच पूजा करण्यास आलेल्या महिलांशी गैरव्यवहार केला. त्यांनी महिलांना मंदिर हटवण्याची मागणी केली. तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मंदिरात तोडफोड केली.
२. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते तेथे गोळा झाले आणि नंतर पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी मंदिराजवळ मोठा बंदोबस्त ठेवला. पोलिसांच्या संरक्षणात जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे.
इंदौर के मंदिर में फिरोज, राशिद और इमरान ने की तोड़फोड़, पूजा कर रही महिलाओं से भी बदसलूकी: मंदिर नहीं हटाने पर जान से मारने की धमकी#MP #Indore #Temple https://t.co/CmH8sRVNrk
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 11, 2023
आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी मंदिर परिसरात अनेकदा मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तोडफोड केली जाऊ लागली आहे. जर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही, तर येथे मोठे आंदोलन केले जाईल. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !