नाशिक येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेशमूर्तीच्या दागिने चोरणार्‍याला अटक !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील रविवार कारंजा भागात असलेल्या चांदीच्या गणपतीचे मंदिर म्हणून ओळखले जाणार्‍या सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली आहे. सुरक्षारक्षकाच्या डोक्यात फटका मारून गणेशमूर्तीचे ३०० ग्रॅम दागिने चोरण्यात आले आहेत. हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. पोलिसांनी चोराचा पाठलाग केल्यावर त्याने गोदावरी नदीत उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिकांच्या साहाय्याने पोलिसांनी चोराला पकडले. निहाल यादव असे त्याचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशमधील आहे.

संपादकीय भूमिका

  • मशिदी किंवा चर्च येथे कधी चोरी झाल्याचे ऐकिवात आहे का ?