कोल्हापूर महापालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात निदर्शने !

नागरिकांना रस्ते, वीज यांसारख्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे ! नागरिकांच्या करातूनच वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात ?

अहिल्यानगर येथील आयुक्तांवर ८ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई !

लाचखोरीत मोठे प्रशासकीय अधिकारी सहभागी असणे, हे भ्रष्टाचाराची समस्या गंभीर बनल्याचे लक्षण !

वित्तीय मान्यता मिळालेल्या विकासकामांचे कार्यादेश त्वरित काढावेत ! – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

वित्तीय मान्यता मिळालेल्या विकासकामांचे कार्यादेश त्वरित काढावेत, अन्यथा पुरेसा निधी व्यय करण्यास मिळणार नाही, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केल्या आहेत. ते स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते.

 दाखले देण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका !  

विद्यार्थ्यांची गैरसोय करणारे आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे, यांना केवळ सूचना करून नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच या परिस्थितीला थोडा तरी आळा बसेल !

सातत्याने  येणार्‍या पुराच्या नियंत्रणासाठी ईशान्य भारतात ५० मोठे तलाव निर्माण करा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

तलावांद्वारे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे अल्प खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास, तसेच पूरस्थिती हाताळण्यासही साहाय्य होईल.

Slipper Thrown on Modi’s Car : पंतप्रधान मोदी यांच्या गाडीवर अज्ञाताने फेकली चप्पल !

मोदी यांच्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकून मारली, हे खरे आहे का ? या घटनेचा तीव्र निषेध व्हायला हवा’, अशी पोस्ट गांधीनगर काँग्रेस सेवादलाच्या ‘एक्स’ खात्यावरून करण्यात आली आहे.

Madhavi Lata Felicitated Women Gorakshak : भाग्यनगरमध्ये गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक रोखणार्‍या हिंदु गोरक्षक महिलांचा सत्कार !

दोन्ही गोरक्षक महिलांना मुसलमान जमावाचा सामना करावा लागला. श्रीवनिता मैथिली आणि सुनीता अशी या गोरक्षक महिलांची नावे आहेत.

Retired Brigadier Of Pakistan Killed : पाकिस्‍तानी सैन्‍याच्‍या निवृत्त ब्रिगेडियरची अज्ञाताकडून हत्‍या

पाकिस्‍तानमध्‍ये अज्ञातांकडून आतंकवादी आणि त्‍यांचे हस्‍तक यांच्‍या होणार्‍या हत्‍या या त्‍यांच्‍या कर्माची फळे आहेत !

Israeli Citizens In Maldives : मालदीवमध्ये इस्रायली नागरिकांच्या प्रवेशबंदीचा निर्णय स्थगित ! 

इस्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांना मालदीवमध्ये येण्यास बंदी घालण्याची घोषणा नुकतीच केली होती.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा !

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. बकरी ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यानुसार असलेल्या प्रावधानांचे पालन करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.