माले – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय स्थगित केला. या बंदीला मालदीवच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी विरोध केला होता. यामध्ये मालदीवचे ऍटर्नी जनरल अहमद उशाम यांचाही समावेश होता.
इस्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांना मालदीवमध्ये येण्यास बंदी घालण्याची घोषणा नुकतीच केली होती. यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची ते म्हणाले होते.