Slipper Thrown on Modi’s Car : पंतप्रधान मोदी यांच्या गाडीवर अज्ञाताने फेकली चप्पल !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौर्‍यावर गेले असतांना त्यांच्या गाडीवर अज्ञाताकडून चप्पल फेकली. सामाजिक माध्यमांत या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात सुरक्षारक्षक गाडीच्या ‘बोनेट’वरून चप्पल उचलून बाजूला फेकत असल्याचे दिसत आहे. ‘फेकलेली वस्तू चप्पल होती कि अन्य काही ?’, याविषयी संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेस सेवादलाकडून निषेध !

‘मोदी यांच्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकून मारली, हे खरे आहे का ? या घटनेचा तीव्र निषेध व्हायला हवा’, अशी पोस्ट गांधीनगर काँग्रेस सेवादलाच्या ‘एक्स’ खात्यावरून करण्यात आली आहे.