Madhavi Lata Felicitated Women Gorakshak : भाग्यनगरमध्ये गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक रोखणार्‍या हिंदु गोरक्षक महिलांचा सत्कार !

महिलांनी मुसलमान जमावाचाही केला सामना !

माधवी लता यांनी गोरक्षक महिलांचा केला सत्कार

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे बकरी ईदपूर्वी गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक रोखणार्‍या दोन हिंदु गोरक्षक महिलांचा भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी गौरव केला.  या वेळी दोन्ही गोरक्षक महिलांना मुसलमान जमावाचा सामना करावा लागला. श्रीवनिता मैथिली आणि सुनीता अशी या गोरक्षक महिलांची नावे आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून २०२४ या दिवशी गायींना एका वाहनात कोंडून मलकापेट येथे नेले जात होते. ही माहिती मिळताच या हिंदु गोरक्षक महिलांनी ट्रक थांबवून गायींना पळवून नेण्यास विरोध केला. या वेळी मुसलमानांच्या मोठ्या जमावाने या महिलांना घेरले आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले.

गोरक्षक महिलांचा  सत्कार

या घटनेची नोंद घेत भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी या दोघी गोरक्षक महिलांचा  सत्कार केला आहे. या महिलांनी आयुष्यभर गोरक्षण करण्याची शपथ घेतल्याचे माधवी लता यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

गायींची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !