आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१४.४.२०२५)

विकृत धर्मांधाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार !

पुणे – हडपसर परिसरात एका विकृत धर्मांधाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. हलीमुद्दिन शेख असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बंगालचा रहिवासी आहे. (अशा विकृत धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) हडपसर येथील हांडेवाडी परिसरात तो वास्तव्यास आहे. कुत्र्याचा मालक कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर ही घटना घडली. कुत्र्याच्या वागणुकीत पालट जाणवल्याने मालकाला शंका आली. त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले असता हा प्रकार उघडकीस आला.

संपादकीय भूमिका : अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळेच समाज रसातळाला चालला आहे !


दागिन्यांची चोरी करणारा अटकेत !

मुंबई – मालाड परिसरात एका व्यावसायिकाच्या घरातून ३६ लाख ४० सहस्र रुपयांच्या सोन्याच्या आणि हिर्‍यांचे दागिन्यांची चोरी करण्यात आली. संतोष सुरेश चौधरी उपाख्य वैतू या सराईत चोराला पोलिसांनी १२ घंट्यात अटक केली आहे. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध ३० गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला.

संपादकीय भूमिका : अशांना कठोर शिक्षाच हवी !


‘श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी उत्सवा’च्या निमित्ताने प्रशासनाकडून मंदिराची पहाणी !

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – येत्या २६ एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची १४७ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने १३ एप्रिलपासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पहाणी करण्यात आली. याविषयीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात अक्कलकोट तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीस प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि देवस्थानाचे प्रतिनिधी उपस्थित होते.