सांगलीत शेकडो भाविकांनी घेतले दुर्मिळ शिवलिंगाचे दर्शन !

सांगलीत शेकडो भाविकांनी घेतले दुर्मिळ शिवलिंगाचे दर्शन !

सांगली, ९ एप्रिल (वार्ता.) – सोमनाथ मंदिरात असलेले १ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन असे शिवलिंग ८ एप्रिलला निशांत कॉलनी येथील महादेव मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या शिवलिंगाचे शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. या प्रसंगी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे शिष्य श्री. दर्शक हाथी, बेंगळुरू येथील ‘वेद विज्ञान महाविद्यापिठा’तील वैदिक पंडित यांच्यासह सांगली येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. शशांक खोत, माजी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, उद्योजक श्री. मनोहर सारडा यासंह विविध मान्यवर उपस्थित होते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने भारतभरातील भाविकांना याचे दर्शन होण्यासाठी यात्रा काढण्यात येत आहे.

भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आलेले दुर्मिळ शिवलिंग