पुणे येथील कुख्यात गुंड टिपू पठाणची पोलिसांनी काढली धिंड !

पुणे – काही दिवसांपूर्वी पुणे येथील कुख्यात गुंड नीलेश घायवळला धाराशिवमध्ये कुस्तीच्या फडातच मारहाण केली होती. पुण्यात दहशत माजवणार्‍या घायवळला मारहाण करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर येथील सय्यदनगर भागात दहशत माजवणार्‍या रिझवान उर्फ टिपू पठाण या गुंडाला पोलिसांनी त्या भागात घेऊन जात धिंड काढली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पठाण हा त्याच्या साथीदारासह पैशांची उधळण करत डान्स करतांनाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला होता. आता एका महिलेची भूमी बळकावल्या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका :

गुंडांना वचक बसण्यासाठी त्यांची समाजात अशा प्रकारे छी-थू करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक आहे !