रायगड जिल्‍ह्यातील धरणांना गळती लागल्याने पाणीसाठा न्यून !

२८ धरणांत केवळ ४३.९९ टक्के पाणी !

अलिबाग – पाटबंधारे विभागाच्‍या अखत्‍यारीत येणार्‍या रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा अतिशय चिंताजनक स्थितीत आहे. २८ धरणांमध्‍ये केवळ ४३.९९ टक्के इतकाच पाणीसाठा शेष आहे. येथील अनेक धरणे ३० ते ४० वर्षांपूर्वी मातीने बांधण्यात आली होती; पण आता त्यांना गळती लागली आहे. त्यामुळेही पाणीसाठा न्यून होत आहे.

पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात सर्वांत जास्त ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, तर श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली धरण क्षेत्रात सर्वांत न्यून १२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.

संपादकीय भूमिका

  • धरणांच्या गळतीकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन काय कामाचे ? अशा कर्तव्यचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फच करायला हवे !
  • गळतीवर उपाययोजना न काढल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत !
  • धरणांना गळती लागण्यापूर्वी त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची सोय प्रशासनाकडे कशी नाही ? याचे उत्तर द्यायला हवे !