सिंहगडावर विदेशी पर्यटकासमवेत गैरवर्तन करणार्‍या ४ तरुणांवर गुन्हा नोंद !

सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार

पुणे – हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ एप्रिल या दिवशी न्यूझीलंड येथून आलेला परदेशी पर्यटक सिंहगडावर ‘ट्रेक’ (गडावर किंवा उंच डोंगरावर चढाई करणे) करायला गेला होता. त्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील मुलांचा गट ट्रेक करत होता. या मुलांनी परदेशी पर्यटकाला मराठीतील अश्लील आणि गलिच्छ शिव्या द्यायला लावल्या. या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाला. या घटनेविषयी खेद व्यक्त करत गडप्रेमींनी पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांत आणि उद्धव ठाकरे गट अन् मनसे यांच्या वतीने (खडकवासला) हवेली पोलीस ठाण्यात संबंधित तरुणांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.

संपादकीय भूमिका :

  • विदेशींसमवेत गैरवर्तन करून भारताची मानहानी करणारी तरुण पिढी देशाला रसातळालाच नेईल ! हे वेळीच रोखायला हवे !
  • विदेशी पर्यटकांसमवेत गैरवर्तन करणार्‍या तरुणांवर केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !