बंगालमध्ये वक्फच्या नावाखाली हिंदूंना मारले जात आहे ! – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – वक्फच्या नावाखाली लोकांना धमकावले जात आहे. बंगालमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत. लोकांना घराबाहेर ओढून मारण्यात येत आहे. तेथे हिंसाचार पसरवला जात आहे. लोकांना धमकावले जात आहे आणि धमक्या दिल्या जात आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.

योगी आदित्यनाथ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत म्हणाले की, हिंसाचाराचा लाभ कुणाला होत आहे ? वक्फच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची भूमी बळकावण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे लोक जिना आणि औरंगजेब यांचे गौरव करत आहेत.

संपादकीय भूमिका :

देशातील केवळ योगी आदित्यनाथ हेच एकमेव शासनकर्ते हिंदूंच्या बाजूने उघडपणे असे बोलतात, हे लक्षात घ्या !