सांगली जिल्ह्यात २५ हून अधिक ठिकाणी भावपूर्ण वातावरणात सामूहिक गदापूजन !

मिरज येथील मारुति मंदिरात झालेले गदापूजन

सांगली, १३ एप्रिल (वार्ता.) – सांगली जिल्ह्यात १२ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भक्त, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विटा (जिल्हा सांगली) येथे महारुद्र हनुमान मंदिरात शिवसेनेचे आमदार श्री. सुहास बाबर यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. बंडोपंत राजोपाध्ये, डॉ. अवधूत बापट उपस्थित होते.

१. विजयनगर, मिरज, उमळवाड येथील मारुति मंदिरात, तसेच तासगाव माळी गल्ली, जयसिंगपूर येथील जैनापूरमधील हनुमाननगर, जत तालुक्यातील डफळापूर येथे गदापूजन करण्यात आले.

२. सांगली येथील शिंदे मळा येथील श्री गणेश मंदिर आणि वसंतनगर येथे हनुमान जयंतीच्या निमित्त सामूहिक गदापूजन करण्यात आले. या वेळी येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.

३. शिरोळ (जिल्हा सांगली) उमळवाड येथे श्री. दानलिंग चौगुले यांच्या खासगी मालकीच्या तालमीमध्ये श्री मारुतीचे पूजन, तसेच विविध तालमीत प्रतिकात्मक गदापूजन करण्यात आले.

४. पलूस येथील श्री धोंडीराज महाराज मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन जाधव यांच्या हस्ते गदापूजन विधी करण्यात आला. या वेळी अधिवक्ता अविनाश युवराज वडार, तसेच इतर बजरंग दलाचे कार्यकर्ते असे एकूण २५ जण उपस्थित होते.

५. ईश्वरपूर येथील श्री महादेव मंदिरात हिंदुत्वनिष्ठ श्री. अजित जाधव यांनी गदापूजन केले. वाळवा येथील मारुति मंदिरात अधिवक्ता योगेश कुलकर्णी यांनी गदापूजन केले.

६. कवठेमहांकाळ तालुक्यातील कवठेमहांकाळ, अग्रण धुळगाव, डफळापूर आणि देशिंग असे एकूण ४ गावांत गदापूजन करण्यात आले. तासगाव तालुक्यातील निमणी येथील मारुति मंदिरात गदापूजन करण्यात आले. या वेळी

१६ जण उपस्थित होते.

७. कौलगे येथील मारुति मंदिर येथे धर्मप्रेमींच्या वतीने गदापूजन करण्यात आले. या वेळी ३५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील समर्थ रामदासस्वामी स्थापित मारुति मंदिरामध्ये मंदिर महासंघाच्या माध्यमातून गदापूजन पार पडले. या वेळी भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव शिंदे सरकार, श्री. अशोक मस्कर, श्री. राजू खुर्द, श्री. विशाल पाटील, श्री. जरंग कुंभार, श्री. बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विटा येथे महारुद्र हनुमान मंदिरात शिवसेनेचे आमदार श्री. सुहास बाबर गदापूजन करतांना
बत्तीस शिराळा येथे मंदिर महासंघाच्या वतीने गदापूजन झाले.
उमळवाड येथे गदापूजन करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक
तासगाव येथे गदापूजन झाले
कौलगे येथे गदापूजन झाले

पलूस येथे गदापूजन करतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. सचिन जाधव