उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘सनातन धर्मा’ची डेंग्‍यू, मलेरिया, कोरोना, एड्‍स आणि कुष्‍ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांना त्‍वरित अटक करण्‍यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्‍हाण यांना देण्‍यात आले. 

नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यास आडकाठी आणू नये !

धर्मप्रेमींनी चर्चा करतांना ‘प्रशासनाने प्रथम नदीत सोडणारे मैलायुक्‍त पाणी बंद करावे आणि नंतर मूर्तीदान मोहिमेच्‍या संदर्भात चर्चा करावी’, असे ठामपणे सांगितले.

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा

कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !

गोवा : विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाचे केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !

गोवा : हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नका !

‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल.

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित

एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

(म्हणे) ‘सनातन धर्म डेंग्यूच्या तापासारखा असून तो नष्ट केला पाहिजे !’ – अभिनेते प्रकाश राज

प्रकाश राज यांनी आधी डेंग्यूला नष्ट करून दाखवावे ! तोंड आहे म्हणून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. सनातन धर्मीय सहिष्णु असल्याने ते कायदा हातात घेऊन अशांना धडा शिकवत नाहीत !

आज ‘हिंदु धर्म संघटने’च्या वतीने ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम ! 

कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’च्या वतीने श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच ११ सप्टेंबरला ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.